ताहाराबाद येथील ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये चौदाव्या वित्त आयोगातील निधीत तसेच इतर सर्व प्रकारच्या ग्राम निधीत मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत असून त्यासाठी शिवसेना बागलाण तालुका प्रमुख सुभाष नंदन यांनी वेळोवेळी लेखी तक्रार व उपोषण करून या भ्रष्टाचारासंबंधी आवाज उठवला होता; मात्र कुठल्याही प्रकारे कारवाई होत नव्हती. अखेर ग्रामपंचायत सदस्य यशवंत पवार, नीलेश कांकरिया, नितीन पवार, तुकाराम आहिरे, कल्पना जाधव, शोभा कांकरिया, प्रमिला नंदन, भाग्यश्री साळवे या आठ सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व प्रकार उघडकीस आणून दिला. यानंतर मुख्याधिकारी यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन तीन सदस्यीय समिती नेमून चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला. या तीन सदस्यीय समितीत सहायक गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी, विस्तार अधिकारी अरुण सूर्यवंशी व विस्तार अधिकारी आर. एस. पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. याअधिकाऱ्यांनी निःपक्ष प्रकारे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे .
ताहाराबाद ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार; चौकशीसाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:18 AM