खेडलेझुंगे : दोन दिवसांपासुन पावसाने ओढ दिल्याने ओल्या जमिनीतून चिखलाचा विचार न करता हाती सापडेल तेवढी पीक काढणीला वेग आलेला आहे. काळ्या गडद चिखलातून हाती सापडेल तेवढी पीके सोंगुण सुरक्षित ठिकाणी लगेच डोक्यावर ओझे बांधून नेली जात आहे. सततच्या पावसामुळे विहीरी तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे पाणी उपसा करण्यासाठीच्या मोटारी पाण्यात गेल्या आहे. पाण्याचा उपसा होत नसल्याने सदरचे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. विहीर आणि बोअरवेल बंद पडल्याने पिण्यासाठी पाणी आणावे कुठुन असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागातील शेतावर वस्ती करु न राहणार्या नागरीकांना पिण्यासाठी पाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण विहीरीतील पाणी काढण्यासाठीच्या मोटारी पाण्यात गेलेल्या आहेत. बोअरवेल मागील मिहन्यापासुन बंद असल्याने बंद पडलेल्या आहेत. सद्या पिण्यासाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बोअरवेलच्या जलपऱ्या आणि मोटारी दुरु स्तीच्या कामाला वेग आलेला आहे. जड वस्तु शेतातुन ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहुन नेतांना ट्रॅक्टर चिखलात रु तुन बसलेले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहे. शेतात पाणी साचुन असल्याने जमिनीत ओल खोलवर असल्याने ट्रॅक्टर फसून जात आहे. जीवाचा आटापिटा करून ट्रॅक्टर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होताना दिसून येत आहे. पावसाने ओढ दिलेली असली तरी जमिनीवर पाणी साचून असल्याने ओल खोलवर आहे. पंधारवाड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे लावलेल्या पिकांकडे ढुंकूनही पाहता आलेले नव्हते. विहिरीमधील मोटारी, जलपºया सर्व नादुरु स्त झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या पिकांसमवेत मोटारी खराब होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
बचावलेली पिके सुरक्षित ठिकाणी वाहून नेण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 2:06 PM