शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

कोथिंबीर १३०, तर मेथी ५१ रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:01 AM

गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारभाव वाढले आहे. रविवारी कोथिंबीर तेरा हजार रुपये शेकडा दराने विक्र ी झाली.

पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतविक्रीसाठी येणाºया कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारभाव वाढले आहे. रविवारी कोथिंबीर तेरा हजार रुपये शेकडा दराने विक्र ी झाली.गुरुवार (दि.१४) कोथिंबीरची आवक कमी प्रमाणात आल्याने कोथिंबीरचे बाजारभाव तेजीत येऊन कोथिंबीर ८० रुपये प्रती जुडी दराने विक्र ी झाली होती, तर पंधरवड्यापूर्वी अवघ्या एक रुपया प्रती जुडी अशा मातीमोल बाजारभावाने विक्री झालेल्या कोथिंबीर जुडीला रविवारी (दि. १७) सायंकाळी झालेल्या लिलावात १३० रुपये प्रती जुडी असा बाजारभाव मिळाला आहे. परतीच्या पावसाने सलग तीन चार दिवस हजेरी लावल्याने शेतातील उभ्या कोथिंबिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे कोथिंबिरीची आवक घटल्याने बाजारभाव पुन्हा तेजीत आलेले आहेत. रविवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीरला तेरा रुपये शेकडा बाजारभाव मिळाल्याची माहिती व्यापारी नितीन लासुरे यांनी दिली आहे.सध्या पितृपक्ष सुरू असल्याने आणि त्यातच परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भागांत दमदारपणे हजेरी लावल्याने कोथिंबीर माल भिजला गेला आहे. त्यातच आवक कमी असली तरी कोथिंबीर मालाला उठाव जास्त असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. रविवारी लिलावात १३० रुपये प्रती जुडी बाजारभाव मिळाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता आहे.