पंचवटी : मुंबई शहर व उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई बाजारपेठेत विक्रीसाठी जाणाऱ्या शेतमालाची आवक घटलेली आहे. मुंबई शहर व उपनगरात जाणारा शेतमाल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती दाखल झाल्याने सोमवार (दि.९) सायंकाळी कोथिंबीर-मेथी मालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभाव घसरले आहेत. काही मालाचा लिलाव न झाल्याने नाराज झालेल्या शेतकºयांनी कोथिंबीर बाजार समितीतच सोडून दिली, तर काहींनी ज्या वाहनातून शेतमाल आणला पुन्हा त्याच वाहनात कोथिंबीर माल टाकून घराकडे नेला.सोमवारी सायंकाळी बाजार समितीत झालेल्या लिलावात कोथिंबीर मालाला प्रतवारीनुसार कमीत कमी २०० रुपये, तर मेथी जुडीला शेकडा ७०० रुपये असा बाजार भाव मिळाला. मुंबई शहरात पावसामुळे भाजीपाला मालाची आवक घटल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला. बाजार समितीतून सध्या गुजरात राज्यात पालेभाज्या मालाची मोठ्या प्रमाणात आवक होती. मुंबईला पाऊस सुरू असल्याने कमी शेतमाल रवाना होत आहे. पावसामुळे आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली. सोमवारी कोथिंबीरच्या हलक्या मालाला २, तर मेथीला सात रु पये प्रति जुडी, असा बाजारभाव मिळाल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.
कोथिंबीर-मेथीचे बाजारभाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:05 AM