नाशिक : जिल्ह्यासह शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या कोथिंबीर, मेथी, कांदापात या पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोथिंबीरचे बाजारभाव टिकून असल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सोमवारी (दि.८) कोथिंबीर १७० रु पये तर मेथी ६० रु पये प्रतिजुडी दराने विक्र ी झाली.याशिवाय मुंबईत पालेभाज्यांना मागणी असल्याने बाजारभाव टिकून आहेत, असे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.गेल्या आठवड्यात २४० रु पये प्रतिजुडी, २४ हजार रु पये शेकडा दराने कोथिंबीरची विक्र ी झाली होती. नाशिक बाजार समितीतून मुंबई तसेच गुजरात राज्यात शेतमालाची निर्यात केली जात आहे. मुंबईला सध्या लातूर जिल्ह्यातील कोथिंबीर मालाची निर्यात काही प्रमाणात केली जात आहे.