शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

पश्चिम भारतातील स्त्रीरोगतज्ज्ञांची परिषद

By admin | Published: September 10, 2014 9:35 PM

पश्चिम भारतातील स्त्रीरोगतज्ज्ञांची परिषद

नाशिक : प्रसूतीदरम्यान व प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या समस्या, वंध्यत्व त्याचप्रमाणे अन्य स्त्रीरोगांविषयी व त्यावरील आधुनिक उपचारपद्धती आणि विकसित तंत्रज्ञानाची नवोदित स्त्रीरोगतज्ज्ञांना माहिती व्हावी आणि जेणेकरून त्यांचे ज्ञान अद्ययावत व्हावे यासाठी पश्चिम भारतामधील स्त्रीरोगतज्ज्ञांची तीनदिवसीय परिषद नाशिकमध्ये होणार असल्याची माहिती आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.देशामधील महिलांचे आरोग्य निरामय राहावे या उद्देशाने फेडरेशन आॅफ आॅबस्ट्रॅक्टीस अ‍ॅण्ड गायनेकोलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया अर्थात फॉग्सीच्या नेतृत्वाखाली शहर स्त्रीरोगतज्ज्ञ सोसायटीच्या वतीने तीनदिवसीय ‘वेस्ट झोन युवा फॉग्सी’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (दि. १२) संध्याकाळी ६ वाजता परिषदेचे उद्घाटन राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते होणार आहे. फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुचित्रा पंडित यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पाटणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ परिषदेच्या अखेरच्या दिवशी दुपारच्या सत्रात हैदराबाद येथील डॉ. अ‍ेविटा फर्नांडिस या प्रसूतितज्ज्ञांचे विशेष व्याख्यान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ व गोवा या सहा राज्यांमधील एकूण सातशेपेक्षा अधिक स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती सचिव डॉ. चंद्रकांत संकलेचा यांनी यावेळी दिली. येत्या गुरुवारपासून (दि. ११) शंकराचार्य संकुलात मोफत युवा मेळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)