नाशिक : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय शिक्षण मंडळाक डून होऊ घातलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा तणावणुक्त, कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार असून, तालुकास्तरावर सुमारे २९ तज्ज्ञ समुपदेशक मार्गदर्शन करणार आहे. नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी २५ जानेवारीला बैठक घेऊन नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन वर्गांचे नियोजन केले आहे. त्यानुसार नाशिकमध्ये १५, जळगावमध्ये ७, धुळ्यात ५, नंदुरबारमध्ये २ समुपदेशक तालुकास्थरावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार असल्याने त्यापूर्वी १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व तालुक्यांमध्ये समुपदेशन वर्ग घेण्याच्या सूचना विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील व प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे अध्यक्ष जालिंदर सावंत यांनी केल्या आहेत. या समुपदेशन वर्गांच्या समन्वयाची जबाबदारी ज्येष्ठ अधिष्ठाता भगवान खारके, अधिष्ठाता बाळासाहेब बडे व समुपदेशक किरण बावा यांनी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या उपक्रमाची पुढील शैक्षणिक वर्षात जून महिन्यापासून वर्षभर अंमलबजावणी होणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
विभागीय शिक्षण मंडळाचे तणावमुक्त परीक्षा अभियान ; विद्यार्थ्यांचे करणार समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 6:51 PM
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय शिक्षण मंडळाक डून होऊ घातलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा तणावणुक्त, कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार असून, तालुकास्तरावर सुमारे २९ तज्ज्ञ समुपदेशक मार्गदर्शन करणार आहे.
ठळक मुद्देविभागीय शिक्षण मंडळाचे तणावमुक्त परीक्षांकडे लक्ष गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी करणार विद्यार्थ्यांचे समुपदेशन