देशमाने : सातत्याने गैरहजर राहणे, कामातील दिरंगाई अन् अनियमितता यामुळे त्रस्त नागरिकांच्या तक्रारींवरून प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी येथील कार्यरत तलाठी एस. आर. गायकवाड यांना निलंबित केले. येथील सजेवर नियुक्ती पासूनच कामातील दिरंगाईमुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. वरिष्ठ अधिकाºर्यांनीदेखील अनेकदा तोंडी, लेखी समज देऊनही सुधारणा होण्याऐवजी त्यात वाढच झाल्याने नागरिकदेखील कुठलीच कामे होत नसल्याने त्रस्त झाली होती. अखेर सामाजिक कार्यकर्ते संदीप दुघड यांनी नागरिकांसमवेत उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान, तलाठ्याच्या निलंबना नंतर लगतच्या तलाठी यांच्याकडे कार्यभार सोपविल्यास पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणार असल्याने येथे पूर्णवेळ कार्यक्षम तलाठ्याची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
देशमानेचा तलाठी अखेर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:28 AM