नाशिक : जिल्ह्यातील २६३ शाखा टपाल कार्यालयांमध्ये मंगळवारी (दि.१८) शुकशुकाट पसरला होता. सकाळी नियमितपणे ग्रामीण डाकसेवक कार्यालयांमध्ये टपालाचा बटवडा करण्यासाठी पोहोचलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गावपातळीवरील टपालसेवा, पोस्ट बॅँकिंगसेवा ठप्प झाली होती.आपल्या विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन व नॅशनल युनियन ग्रामीण डाकसेवक संघटनांच्या वतीने देशव्यापी संप पुकारला आहे. मे महिन्यात तब्बल १६ दिवस ग्रामीण डाकसेवक याच मागण्यांसाठी संपावर होते. तेव्हाही शासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेतली नसल्यामुळे पुन्हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. डाक विभागाने कमलेशचंद्र समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, ही या संपाची प्रमुख मागणी आहे. या मागणीचे आश्वासन मे महिन्यात शासनाकडून देण्यात आले होते; मात्र सात महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील याबाबत ठोस निर्णय होऊ शकला नाही. सरकारने आश्वासनानंतर तोंडाला पाने पुसल्याने मंगळवार (दि.१८)पासून देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्णातील २६३ शाखा कार्यालयांमधील सुमारे ३७५ डाकसेवक या संपात सहभागी असल्याचा दावा आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन नाशिक विभागाचे सचिव सुुनील जाधव, विभागीय अध्यक्ष आर. एस. जाधव यांनी केला आहे. जोपर्यंत वरिष्ठ स्तरावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याची माहिती संबंधितानी दिली आहे....अशा आहेत मागण्या. कमलेशचंद्र समितीच्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात.च्युईटीची रक्कम ५ लाख रुपये करावी.सडीबीएसची कपात १० टक्के सरकारने जमा करावी व ईएसआय आणि ईपीएफची सेवा योजना अमलात आणावी.करीचा अनुभव लक्षात घेता बारा वर्षे सेवा बजावणाऱ्या डाकसेवकांना पदोन्नती द्यावी. दिवसांची पगार रजा दरवर्षी मिळावी.लांच्या शिक्षणासाठी दरवर्षी सहा हजार इतका भत्ता दिला जावा.पोझिट अलाउन्स रुपये ५०० वरून सोळाशेपर्यंत हा भत्ता जीडीएस कर्मचाºयांना द्यावा.डीएस कर्मचाºयांना ८ तासांचे काम देण्यात यावे तसेच प्रत्येकी कार्यालयात दोन माणसे नियुक्त करावीत.
देशव्यापी संप : गावपातळीवर टपालसेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:37 PM