शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

पतंगबाजीचे शौर्य, पक्ष्यांसाठी क्रौर्य

By admin | Published: January 05, 2017 2:06 AM

संकल्प : ‘नायलॉन मांजा टाळूया, मोकळे आकाश देऊया’

अझहर शेख नाशिकआगामी मकर संक्रांत सणाच्या औचित्यावर आकाशात आतापासूनच पतंगांची गर्दी होऊ लागली आहे. पतंगबाजीचे शौर्य नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसाठी क्रौर्य ठरू लागले आहे. नव्या वर्षात निसर्गाचा हा खरा दागिना अधिक सुरक्षित कसा राहील, यादृष्टीने कृती करण्याची गरज आहे.पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा होणारा वापर जसा पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरणारा आहे तसाच माणसांसाठीही जिवावर बेतणारा आहे. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी नायलॉन मांजाची विक्री व वापरावर निर्बंध आणले आहेत. चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून कारवाई जरी सुरू असली तरी काही विक्रेते नायलॉन मांजा विकतात आणि त्यांना मिळणारा ग्राहकवर्गही चोरट्या मार्गाने मांजा खरेदी करून पतंगबाजीच्या क्रौर्यामुळे पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे. दरवर्षी शेकडो पक्षी आकाशात नायलॉन मांजाच्या जाळ्यात अडकून गंभीररीत्या जखमी होऊन तडफडत प्राण सोडतात. पाच ते दहा रुपयांची पतंग कापली जाण्याच्या चिंतेपोटी युवक नायलॉन मांजा हातात घेतात आणि मानवाबरोबरच पक्ष्यांचाही जीव धोक्यात घालतात. नायलॉन मांजाने माणूस एकदा गंभीर जखमी होत असला तरी हा मांजा वीजतारा, झाडांच्या फांद्यांमध्ये वर्षानुवर्षे अडकून राहतो आणि पक्ष्यांच्या पंखांना नेहमीच त्यापासून दुखापत होत असते. झाडांवर पक्षी अडकले किंवा उलटे लटकून तडफडत असल्याचे ‘रेस्क्यू कॉल’ अग्निशामक मुख्यालयात संक्रांतीपासून कायमस्वरूपी सुरू होतात.