शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

आचारसंहितेविरोधात न्यायालयात धाव

By admin | Published: October 20, 2016 1:22 AM

केदा अहेर : जिल्हा परिषदेला वगळा

नाशिक : नगरपालिकांच्या निवडणुकांमधून जिल्हा परिषदेला वगळण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केल्यानंतर आता कृषी सभापती केदा अहेर यांनी या आचारसंहितेमुळे कोट्यवधींची विकासकामे रखडणार असल्याने त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.बुधवारी (दि. १९) त्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आचार संहितेच्या नियमांबाबत माहिती घेतली. तसेच या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना फटका बसणार असल्याचे जिल्हा प्रशासनाला सांगितले. नगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषदेचा तसा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष थेट संबंध येत नाही. जिल्हा परिषदेच्या कोणत्याही योजनांचा थेट परिणाम नगरपालिका क्षेत्रातील मतदारांवर होत नाही. या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेची कोट्यवधी रुपयांची विकासकामे रखडणार आहेत. शिवाय दोनपेक्षा कमी जिल्ह्याला आचारसंहिता लागू नाही आणि चारपेक्षा जास्त नगरपालिकांच्या निवडणुका असलेल्या जिल्ह्यांसाठी आचारसंहिता लागू करणे म्हणजे समान न्यायाला धरून नसल्याने याबाबत आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी दिली. (प्रतिनिधी)