नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार व्यावसायिकांनी दाखल केलेल्या सर्व याचिका उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावल्या असल्याची माहिती भंगार बाजारविरोधात सातत्याने लढा देणारे नगरसेवक दिलीप दातीर यांनी दिली आहे. गैरवापर केल्याप्रकरणी न्यायालयाने दंड ठोठावत यापुढे दाद मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजेही कायमचे बंद केल्याने भंगारमाल विक्रेत्यांना मोठा दणका बसला आहे.न्यायालयाच्या निर्णयामुळे महापालिकेकडून गुरुवारी (दि. १२) होणाºया कारवाईचाही मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारी २०१७ मध्ये महापालिकेने भंगार बाजार हटविण्याची कार्यवाही करूनही पुन्हा एकदा भंगार बाजार वसला. शिवाय, भंगार बाजारावर पुन्हा होणारी कारवाई टाळण्यासाठी भंगारमाल व्यावसायिकांच्या असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलेली होती. भंगार बाजार व्यावसायिकांनी दाखल केलेल्या याचिकेत आपल्यालाही सहभागी करून घ्यावे अशी विनंती शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांच्या वकिलांनी केली होती. आज कारवाई होणारच !गुरुवारी (दि. ११) भंगार बाजार हटविण्याची महापालिकेने पूर्ण तयारी केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणारच. महापालिकेने संबंधितांना भंगार माल जागेवरून काढून घेण्यासाठी महिनाभरापूर्वीच नोटीस दिलेली होती. आता पुन्हा मुदत दिली जाणार नाही.- अभिषेक कृष्ण, आयुक्त, मनपा
भंगार विक्रेत्यांना न्यायालयाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:46 AM