नाशिक-वर्षभरापासून चालू असलेल्या संघटना विश्वस्तांच्या मूळ वादाला निर्णायक वळण देत सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी तोडगा काढलाआहे.याद्वारे नाशिकच्या बुद्धिबळ क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली आहे. कायदेशीर बाबींच्या कचाट्यातून खेळाची सुटका करून बुद्धिबळ क्षेत्रातील जाणकारांची निवड संस्थेच्या विश्वस्थ पदांवर करतनव्या पर्वाची सुरवात नाशिकमध्ये झाल्याची भावना महाराष्ट्राच्या बुद्धिबळ क्षेत्रातील जुन्या जाणत्या खेळाडूंनी व्यक्त केली. अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा संघटनेच्या वादावर अखेरीस नाशिकच्या खेळाडूंच्या हिताचा निर्णय घेत जाहीर मुलाखतीद्वारे २४ अर्जांतून फक्त ९ लोकांची बुद्धिबळ गुणवत्तेच्या निकषांवरनिवड करत खेळ संघटने संदर्भातील वादांवर एक स्तुत पायंडा घातल्याबद्दल सहाय्यक धर्मादाय आयुक्त वैशाली पंडित यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन केले जात आहे. बुद्धिबळ क्षेत्रामधील अनुभव, संघटनात्मक बांधणीचे कसब, खेळाडू,प्रशिक्षक यांची गुणवत्ता, ग्रामीण भागातील काम तसेच सामाजिक कामांचा अनुभव व कौशल्य, संघटनेला जागतिक स्तरावर घेऊन जाऊ शकण्याची क्षमता अश्या कडक निकषांवर खरे ठरून नाशिक बुद्धिबळ क्षेत्राला योगदान देणाऱ्या ९ जणांची निवड संघटनेच्या विश्वस्थ पदांवर केली आहे. सी.ए.विनय बेळे, उद्योगपती धनंजय बेळे, डॉक्टर राजेंद्र सोनवणे, सुनील शर्मा, खेळाडू जयेश भंडारी, जयराम सोनवणे, विनायक वाडीले, मिलिंद कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मंगेश गंभिरे या बुद्धीबळ खेळाशी खेळाडू, कार्यकर्ता म्हणून संबंधित लोकांवर नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निर्देशानुसार नवनियुक्त विश्वस्थांची प्रथम बैठक घेण्यात आली असून सर्व विश्वस्थांच्या उपस्थितीत व मान्यतेने पदाधिकाºयांची निवड करण्यात आली आहे. मुख्य पदाधिकाºयांच्या नियुक्तीबाबत सर्वानुमते अध्यक्ष पदावर विनय बेळे, उपाध्यक्षपदी डॉ. राजेंद्र सोनावणे साहेब,सचिवपदी सुनील शर्मा व खजिनदार पदावर जयेश भंडारी यांनी पदभार स्विकारला.
नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतील वादावर धर्मादाय कोर्टाने काढला तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 5:55 PM
विश्वस्तांच्या मूळ वादाला निर्णायक वळण
ठळक मुद्देविश्वस्तांच्या मूळ वादाला निर्णायक वळण