शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

रेशन धान्य घोटाळ्याच्या तपासावर न्यायालयाचे ताशेरे

By admin | Published: November 08, 2016 11:48 PM

वाडीवऱ्हे रेशन धान्य घोटाळा : मास्टरमार्इंड जितूभाई ठक्कर अद्यापही फरार

नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल झालेल्या वाडीवऱ्हे रेशन धान्य घोटाळ्याच्या तपासाबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी ग्रामीण पोलिसांवर कडक ताशेरे ओढल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे़ तसेच या घोटाळ्याचा मास्टरमार्इंड जितूभाई ठक्कर पोलिसांना सापडत नसल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़ दरम्यान, या घोटाळ्यातील उर्वरित चौघा संशयितांविरोधात येत्या महिनाभरात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे़ रेशन धान्य घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने आॅक्टोबरमध्ये या गुन्ह्णात घोटी येथील संशयित दीपक श्रीश्रीमाळ व अन्य एकास अटक केली होती़ या दोघांचीही पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली़ मात्र, या कालावधीनंतर श्रीश्रीमाळ यास कोर्टात हजर केले असता तपासात प्रगती न आढळल्याने तसेच दोषारोपपत्र दाखल केले परंतु काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच मुद्देमाल हजर न केल्याबाबत न्यायालयाने तपास पद्धतीवर चांगलेच ताशेरे ओढले होते़ तसेच संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर संबंधित तपास अधिकारी वैद्यकीय रजेवर गेल्याने या प्रकरणाचा तपास पुन्हा दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे़ रेशन धान्य घोटाळ्यातील मास्टरमार्इंड जितूभाई ठक्करकडून माल घेणे त्याच्या बँक अकाउंटमधून पैसे काढण्याचे काम श्रीश्रीमाळ करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़ यातील संशयित जितूभाई ठक्कर हा सुमारे १७ महिन्यांपासून पोलिसांच्या हाती लागलेला नाही़ तसेच त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून संथपणे तपास करून पोलीस त्यास अप्रत्यक्षपणे मदत करीत असल्याची चर्चा आहे़ दरम्यान, रेशन धान्य घोटाळाप्रकरणी पोलिसांनी संशयित अरुण घोरपडे, संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर, काशीनाथ पाटील, ज्ञानेश्वर घुले, धरमसिंग पटेल, जितेंद्र ठक्कर, पूनम होळकर, गुदामपाल संजय कचरू वामन,अश्विन जैन व प्रकाश शेवाळे असे एकूण तेरा आरोपी असून त्यामध्ये आणखी दोन जणांची भर पडली आहे़(प्रतिनिधी)घोटाळ्यातील मास्टरमार्इंड जितूभाई ठक्करच्या मिळकती सरकारजमा का करण्यात येऊ नये याबाबत जाहीरनामा काढण्यात आला असून तो त्याच्या मिळकतींवर चिकटविला जाणार आहे़ या गुन्ह्णातील सर्व संशयितांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून ते कारागृहात आहेत़ तर उर्वरित चौघांचे दोषारोपपत्र येत्या महिनाभरात न्यायालयात दाखल केले जाईल, तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार मुद्देमाल व पंचनामे पूर्ण करून सादर करण्यात आले आहेत़ या घोटाळ्यामधील आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीने तपास सुरू आहे़ - देवीदास पाटील, कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी़