शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

नाशिक बाजार समितीला न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 6:34 PM

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूणच कारभाराच्या विरोधात सहकार खात्याने चालविलेल्या चौकशीच्या आधारे गेल्या आठवड्यात सहकार आयुक्तांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर अनिल चव्हाण यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.

ठळक मुद्देबरखास्तीला स्थगिती : संचालकच कामकाज पाहणार न्यायालयाने आपल्या पुर्वीच्या निर्णयाला १३ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी उच्च न्यायालयात सहकार खात्याने पाठविलेल्या नोटीसीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी होवून संचालक मंडळाला आणखी एक महिन्यांचा दिलासा मिळाला. बाजार समिती बरखास्त झाल्यानंतर संचालक मंडळाला न्यायालयात दाद मागण्यासाठी प्रशासकांनी पुरेसा वेळ द्यावा ही प्रमुख मागणी न्यायालयाने मान्य करून एक प्रकारे बरखास्तीच्या कारवाईला स्थगिती दिली.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूणच कारभाराच्या विरोधात सहकार खात्याने चालविलेल्या चौकशीच्या आधारे गेल्या आठवड्यात सहकार आयुक्तांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर अनिल चव्हाण यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. बाजार समितीच्या सन १९९५ पासूनच्या कारभारात महाराष्टÑ राज्य कृषी पणन महामंडळाचे थकीत कर्ज, राज्य सहकारी बॅँकेचे थकीत कर्ज, कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी, निलंबीत कर्मचा-यांच्या वकील फी खर्च, जाहीरातबाजीवर केलेला अनावश्यक खर्च, रोजंदारी कर्मचा-यांची अनावश्यक भरती यासह दहा मुद्यांवर जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या विद्यमान संचालकांना कलम ४५ नुसार नोटीस बजावली होती. या नोटीसीच्या विरोधात गेल्या वर्षीच संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती व विद्यमान संचालक मंडळाच्या कारकिर्दीत उपरोक्त घटना घडलेल्या नसून, पुर्वीच्या संचालकांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयासाठी विद्यमान संचालकांना दोषी धरणे चुकीचे व अन्यायकारक असल्याची बाजु मांडली होती. त्यावर न्यायालयाने संचालकांचे म्हणणे विचारात घेऊन बाजार समिती बरखास्त झाल्यास प्रशासकांनी पंधरा दिवसानंतर पदभार घ्यावा, तो पर्यंत संचालक मंडळाला कारवाईच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येईल असे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात बाजार समिती बरखास्त झाल्यानंतर संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली असता, मंगळवारी त्यावर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने आपल्या पुर्वीच्या निर्णयाला १३ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक नेमूनही आता प्रशासकाला पदभार स्विकारता येणार नाही, त्याच प्रमाणे बाजार समितीचे संचालक पुर्वी प्रमाणे बाजार समितीच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक