दरम्यान, सध्या महापालिकेचे एकही कोविड सेंटर बंद करण्यात येणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिले आहे.
नाशिक शहरातील १८८ रुग्णालयांत ८ हजार २१४ खाटा कोविड रुग्णांसाठी होत्या. त्यातील ५ हजार ७७५ खाटा रिक्त झाल्या आहेत. सध्या २४३९ खाटांवरच रुग्ण आहेत. ज्या ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेडसाठी नागरिकांना धावपळ करावी लागली आणि एकेका बेडसाठी रुग्णांचा जीव कासावीस झाला, ते बेडही आता माेठ्या प्रमाणात रिक्त असून ऑक्सिजनचे २ हजार ४७७ तर व्हेंटिलेटर्सचे ४६३ बेड्स उपलब्ध आहेत.
शहरातील पंधरा कोविड केअर सेंटर्समध्येदेखील रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यात महापालिकेच्या मेरी कोविड केअर सेंटरमध्ये १८० पैकी १३२, समाजकल्याण विभागाच्या जागेतील पाचशे पैकी ३०९ आणि ठक्कर डोममध्ये ३२५ पैकी २९७ खाटा रिक्त आहेत. महापालिकेच्या बिटको सेंटरमधील चारशे पैकी केवळ बाराच जनरल खाट शिल्लक आहेत. कारण त्याठिकाणी अजूनही रुग्ण दाखल आहेत.
शहरातील काही सेवाभावी संस्थांच्या कोविड सेंटर्समध्येदेखील बऱ्यापैकी जागा रिक्त आम्ही सातपूरकर यात १०० पैकी ९५ खाटा रिक्त आहेत. भारतीय ट्रेड युनियन केंद्रात ५० पैकी ४८, क्रॉप्टन हॉल केंद्रात ६५ पैकी ४९ आणि ऑक्सिजन २० पैकी १५ खाटा रिक्त आहेत. पंचवटीत माँसाहेब मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे एकूण १२० जनरल खाटांपैकी पन्नास तर १८० ऑक्सिजन बेड्सपैकी शंभर, पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या सेंटरमध्ये शंभरपैकी ८६, सिडकोतील संभाजी स्टेडियममध्ये १८० पैकी १६५ आणि २० ऑक्सिजन बेडपैकी दहा खाटा रिक्त झाल्या आहेत.
इन्फो...
पाच कोविड सेंटर्सची रुग्णसंख्या शून्य
शहरातील पाच कोविड सेंटर्समध्ये आता रुग्ण संख्या शून्य झाली आहेत. यात डॉ. पारनेरकर महाराज हॉस्पिटलमध्ये तर पंधरापैकी पंधरा खाटा रिकाम्या झाल्या आहेत. नाशिकरोड येथील फायर क्वॉटर्समध्ये देखील पन्नासच्या पन्नास खाटा रिक्त झाल्या आहेत. हॉटेल एमराल्ड पार्कमधील जैन इंटरनॅशनल सेंटरच्यादेखील पन्नास पैकी पन्नास, माहेश्वरी स्टुडंट्स सेंटर येथे ४२ पैकी ४२ तसेच कच्छी लोहाणा मंगल कार्यालयात वीस पैकी वीस म्हणजे सर्वच खाटा रिक्त आहेत.
इन्फो..
दृष्टिक्षेपात स्थिती
१८८
एकूण कोरोना रुग्णालये
८,२१४
एकूण खाटा
५,७७७
एकूण रिक्त खाटा
२४३९ वापरात असलेल्या खाटा
इन्फो...
३१३२
एकूण जनरल खाटा
२१३४
रिक्त खाटा
३७२६
एकूण ऑक्सिजन खाटा
२४७७
रिक्त असलेल्या ऑक्सिजन खाटा
१०७४
एकूण आयसीयू खाटा
७०१
रिक्त आयसीयू खाटा
८३९
एकूण व्हेंटिलेटर्स बेड
४६३
रिक्त व्हेंटिलेटर्स बेड
-
-- कोट...
महापालिकेने कोणत्याही कोविड रुग्णालयाला नॉन कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यास परवानगी दिलेली नाही. तसेच कोविड केअर सेंटर्सदेखील अद्याप बंद केलेले नाही. महापालिकेची कोविड सेंटर तर कायम ठेवण्यात येणार आहेत. केवळ ठक्कर डोम येथे दुरूस्ती आणि देखभालीसाठी नवीन रुग्ण दाखल करून घेतलेले नाहीत.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक,महापालिका (डॉ. नागरगोजे यांचा फोटो वापरावा आर फोटोवर २७ बापूसाहेब नागरगोजे नावाने)