लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : गेल्या काही दिवसांपूर्वी महावितरणच्या गलथान कारभारामुळे अश्विननगर भागातील शंभराहून अधिक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले होते. यापाठोपाठच बुधवारी सकाळी पवननगर पोलीस चौकी मागील रस्त्याच्या वरवर टाकण्यात आलेल्या व निकृष्ट दर्जाच्या वीजवाहक केबलमुळे विजेचा प्रवाह रस्त्यात उतरल्याने गाय मृत्युमुखी पडली. दरम्यान, याचवेळी गायीची पूजा करण्यास आलेल्या किरण चौरे या महिलेलादेखील विजेचा झटका बसल्याची घटना घडली आहे.सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील पवननगर पोलीस चौकी मागील रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या भूमिगत वीजवाहक केबलमुळे विजेचा प्रवाह रस्त्यात उतरला होता. याबाबत नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांनी दखल घेतली नाही. यानंतर नागरिकांनी याबाबतची माहिती नगरसेवक श्यामकुमार साबळे यांना कळविली त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली व महावितरणच्या अधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेचे गांभीर्य नाही का? असा सवाल केला.यानंतर काही वेळातच महावितरणचे कर्मचारी आले व त्यांनी वीज प्रवाह खंडित केला. यावेळी स्थानिक नागरिक उमेश पाटील, दादा कापडणीस, अमोल सदावर्ते, राधाकृष्ण अहेर, प्रभाकर पाटील यांसह नागरिक उपस्थित होते.
विजेचा शॉक लागल्याने गाय मृत्युमुखी
By admin | Published: July 14, 2017 1:28 AM