जानोरी : ‘राधे राधे राधेकृष्ण राधे....’ या गजरात येथील श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद असले तरी पुजारी, देवस्थानचे विश्वस्त आणि मोजक्या भाविकांसह उत्साहात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विश्वस्त व उपस्थित भाविकांनी श्रीकृष्ण मूर्तीवर गुलाल व पुष्पवृष्टी करीत जन्माचा पाळणा गायला. यावेळी श्रीकृष्ण मूर्र्तीला विविध अलंकारांनी सजविण्यात आले होते. याशिवाय मंदिरावरही विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कोरोनामुळे सामान्य भाविकांना जरी मंदिरात प्रवेश नसला तरी रात्री बाराच्या ठोक्याला परिसरातील भाविकांनी बाहेरूनच श्रीकृष्ण नामाचा जयघोष केला. यावेळी पेढे व पंजिरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रीकृष्ण मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. बुधवारी सकाळी श्रीकृष्ण मूर्तीस पंचसुक्त पवमान सुक्ताने जलादुग्धाभिषेक करण्यात आला. सतीश कुलकर्र्णी यांनी पौरोहित्य केले.
मोहाडीत गायला श्रीकृष्णजन्माचा पाळणा, मंदीरावर रोषणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 9:33 PM
जानोरी : ‘राधे राधे राधेकृष्ण राधे....’ या गजरात येथील श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद असले तरी पुजारी, देवस्थानचे विश्वस्त आणि मोजक्या भाविकांसह उत्साहात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देमोजक्या भाविकांसह उत्साहात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा