नाशिक : कत्तलीसाठी गायींची तस्करी करणारा पिकअप टेम्पो मनोली शिवारातील धागुर येथे उलटल्याने त्यात तीन गायींचा गुदमरून मृत्यू झाला. एकूण १० ते १२ बारा गायी कोंबून भरण्यात आल्याने गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेत गायींची सुटका केली तर चोरट्यांनी अपघातानंतर टेम्पो सोडून पलायन केले.नाशिक-दिंडोरी रोडवर रात्रीच्या वेळेस कोचरगाव, धागुरमार्गे गायींची कत्तल करण्यासाठी वाहतूक होत असल्याची तक्रार दिंडोरी पोलीस स्थानकात अनेकदा करण्यात आली. परंतु दिंडोरी व नाशिकची हद्द असल्याने नाशिक तालुका पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करतात, तर दिंडोरीतील पोलीसही आळा घालण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे तस्करांचे फावले असून, त्यातूनच मंगळवारी रात्री पिकअप (क्रमांक एमएच १५, डीके ७७३२) मध्ये दहा ते बारा गायी क्रूरपणे कोंबून ते नाशिकच्या दिशेने येत असताना समोरून येणाºया वाहनाने कट मारल्याने पिकअप टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला. त्यातील तीन गायींचा गुदमरून मृत्यू झाला तर काही जखमी गायींची सुटका करण्यात आली आहे. सदरचे पिकअप हे जुन्या नाशकातील असून, चोरट्या वाहतुकीमुळे सदरचा टेम्पो भद्रकाली पोलीस स्थानकाने काळ्या यादीत टाकला आहे.मागील काही वर्षांपासून जनावरे चोरीला जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे चोरट्यांचे फावते आहे.- सोमनाथ निम्बेकर, शेतकरी
गायींची चोरटी वाहतूक करणारा टेम्पो उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:15 AM