विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात आजवर सातवेळा निवडून आलेले जिवा पांडू गावित हे या पक्षाचे संचित असले तरी ही एकमेव जागा या पक्षाने गमाविली, तर नाशिक पश्चिममध्ये कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांचा पुन्हा पराभव झाला. त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आघाडीबरोबर राहूनदेखील राष्टÑवादीशी मैत्रिपूर्ण लढत करावी लागली आणि त्याचा फटका माकपाला बसला.नाशिक जिल्ह्यात आदिवासी बहुल पट्ट्यात माकपाचे वर्चस्व मानले जाते. त्यातही यापूर्वीचा कळवण आणि नंतर आता कळवण-सुरगाणा मतदारसंघ हा पक्षाच्या ताब्यात राहिला आहे. सुरगाणा या मतदारसंघावर अपवाद वगळता १९७८ पासून माकपाचे वर्चस्व कायम आहे. २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत सुरगाणा विधानसभा मतदारसंघात कळवण तालुक्याचा समावेश करण्यात आल्यानंतर मात्र राजकारण बदलले आणि माकपाला पराभव पत्करावा लागला. यानंतर २०१४ मध्ये पुन्हा हा मतदारसंघ माकपाने आपल्या ताब्यात घेतला. आता आघाडी असून, सुद्धा राष्टÑवादीने कळवणमध्ये तर उमेदवार दिलाच; परंतु नाशिक पश्चिममध्ये डॉ. डी. एल. कराड यांना आधी पाठिंबा देऊननंतर डॉ. अपूर्व हिरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात आघाडीशी दोन हात करावे लागले. यात कळवणला राष्ट्रवादीची सरशी झाली.
माकपाचा हक्काचा बुरुज ढासळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 1:41 AM