नाशिक : ऐन दिवाळ सणात बँकांना सलग तीन दिवस सुटी आसल्याने नाशिकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, खात्यावर पैसे असतानाही रोखीचे व्यवहार करण्यासाठी हातात पैसे नसल्याने नाशिकरांना निराशा पत्करावी लागल्याचे रविवारी (दि.१५) दिसून आले.
दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी शनिवारी (दि.१४) नाशिकरांनी शहरातील विविध एटीएममधून रोख रक्कम काढल्याने रविवारी बहुतांश एटीएममध्ये खडखडाट पाहायला मिळाला. डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाइल ॲपचा वापर करू न शकणाऱ्या सामान्य ग्राहकांना खात्यावर पैसे असूनही ते तीन दिवस मिळणार नसल्याने ऐन दिवाळी उसणवारीचे व्यवहार करावे लागले. यावर्षी लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या दोन तिथींमध्ये एक दिवस मिळाल्याने त्याचा नाशिककरांनी खरेदीसाठी लाभ घेतला. परंतु अनेक छोट्या-मोठ्या व्यवहारांमध्ये रोख रकमेअभावी ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला. हीच परिस्थिती सोमवारीही कायम राहणार असल्याने खिशात रोख रक्कम नाही आणि ऑनलाइन अथवा मोबाइल ॲपद्वारे व्यवहार करू न शकणाऱ्या ग्राकांची गैरसोयच होण्यार आहे, दरम्यान, शनिवारी लक्ष्मीपूजून, रविवार आणि सोमवारची भाऊबीज अशा सलग तीन दिवस बँकांना सुटी आहे. या सलग सुट्यांचा ताण एटीएमवर पडला असून, वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
इन्फो-
एटीएम शोधाशोध
दिवाळी खरेदीसाठी अनेकांना रोख रक्कमेची गरज भासली. त्यामुळे अशा ग्राहकांना ऐनवेळी एटीएमची शोधाशोध करावी लागली. बहुतांश एटीएममध्ये रोख रक्कमच नसल्याने ग्राहकांची निराशा झाल्याचे दिसून आले.