नाशिक : मुंबईतील महात्मा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटमधील बंद पडलेल्या ऐतिहासिक घड्याळाची टिक टिक पुन्हा सुरू करण्याची कामगिरी नाशिकच्या कारागिराने पार पाडली आहे. सन १८७५ मध्ये खास इंग्लंडमधून आणून बसविलेले हे घड्याळ १९९० पासून बंद स्थितीत होते. सदर घड्याळ सुमारे ११५ वर्षे चालू स्थितीत होते. चावी भरून त्यावर चालणाºया या घड्याळाची डायल साडेसहा फूट व्यासाची असून, चार दिशांना चार घड्याळे होती. १९९० पासून सदर घड्याळ देखभालीअभावी बंद स्थितीत होते. बृहन्मुंबई महापालिकेने सदर जुने चावीचे मशीन बदलून त्यावर अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीचे घड्याळ बसविण्यासाठी अनुभवी कारागिरांकडून प्रस्ताव मागविले होते. जुन्या ऐतिहासिक घड्याळांची कामे करणाºया नाशिकच्या रविवार पेठेतील गणेश वॉच कंपनीच्या विजय खडके यांनी त्याबाबतचा प्रस्ताव पाठविला आणि तो मान्य झाला. त्यानुसार, खडके यांनी हुबेहूब डायल तयार करून त्या क्रॉफर्ड मार्केटमधील घड्याळाला बसविल्या आणि घड्याळाची टिक टिक पुन्हा सुरू झाली. या प्रकल्पासाठी खडके यांना पुराणवास्तू तज्ज्ञ अबा नरेन लांबा व त्यांचे अभियंते यांचे सहकार्य लाभले. गणेश वॉच कंपनीने भारतभरातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक घड्याळांच्या दुरुस्तीची कामे हाताळली आहेत. नाशिकच्या मेनरोडवरील जुन्या नगरपालिका इमारतीवरील घड्याळाचीही देखभाल- दुरुस्ती खडके यांनी पार पाडलेली आहे.
क्रॉफर्ड मार्केटच्या ऐतिहासिक घड्याळाची पुन्हा टिक टिक २७ वर्षांपासून बंद : नाशिकच्या कारागिराने केली दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 1:13 AM
नाशिक : मुंबईतील महात्मा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटमधील बंद पडलेल्या ऐतिहासिक घड्याळाची टिक टिक पुन्हा सुरू करण्याची कामगिरी नाशिकच्या कारागिराने पार पाडली आहे.
ठळक मुद्देसदर घड्याळ सुमारे ११५ वर्षे चालू स्थितीत होतेअनुभवी कारागिरांकडून प्रस्ताव मागविले