एप्रिल महिन्याआधीच जिल्ह्यात तपमान ४० अंशावर पोहचले आहे. कडक उन्हाच्या भीषणतेने जंगलातील पाणीसाठे झपाटयाने कमी होत आहेत. गोहरण, धोंडबे हट्टी , कानमंडाळे या चांदवड तालुक्यातील वनविभागाच्या जंगलात कमीत कमी शंभरावर हरणे आहेत. हरणे व इतर पशु हे पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. रस्ता ओलाडतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनास धडकून वडाळीभोई, खडकजांब परिसरात मुंबई-आग्रा हायवेवर दोन ते तीन हरीण मृत्युमुखी पडले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून चांदवड वनविभाग व हिंदुहृदयसम्राट मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे गोहरण धोडंबे येथील वनविभागात मध्यवर्ती ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांमुळे हरिण तसेच जंगलातील प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. सदर कृत्रिम पाणवठे बांधण्यासाठी वनरक्षक नवनाथ बिन्नर, अण्णासाहेब टेकनर विजय वाफाळे, आकाश गुळवे, अमोल सोनवणे, प्रविण जाधव, प्रसाद हिंगमिरे, किरण सोनवणे, प्रकाश जाधव, विशाल पवार व सदस्यांनी परिश्रम घेतले.
गोहरण परिसरात प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 5:16 PM