नाशिक : नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकरोड विभागीय कार्यालयात क्रेडाई नाशिकमेट्रोच्या कार्यकारिणीने भेट घेऊन बांधकाम व्यावसायिकांना सामोरे जावे जात असलेल्या समस्यांबाबत निवेदन दिले़ बांधकाम व्यावसायिकांच्या समस्येवर सकारात्मक चर्चा होऊन प्रश्न लवकर मार्गी लागावे, यासाठी मंत्रालयात सखोल चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले़यावेळी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे, सचिव कृणाल पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र ठक्कर, रवि महान, सहसचिव सचिन बागड, अनिल आहेर, मनोज खिवंसरा, राजेश पिंगळे आदी सदस्य उपस्थित होते़मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौºयात विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाºयांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांची निवेदने सादर केली.सायकल ट्रॅकची मागणी नाशिक सायकलिस्टचे प्रविणकुमार खाबीया, उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, लक्ष्मण सावजी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी नाशिक शहरातून जाणाºया गोदावरी उजव्या तट कालव्यावर ३२ किलो मीटर लांबीच्या मार्गावर सायकल ट्रॅक उभारावा, नाशिकच्या रिंगरोडला सायकल ट्रॅकची व्यवस्था करावी, कृषी नगर येतील सायकल सर्कल ते मोतीवाला कॉलेज दरम्यान सायकल ट्रॅक उभारावा अशाप्रकारच्या मागण्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरच पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही निवेदन देण्यात आले.
क्रेडाई, सायकलिस्टचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:44 AM