शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

पर्यावरण रक्षणासाठी क्रेडाईचा पुढाकार

By admin | Published: May 17, 2015 11:49 PM

भूमिपूजन : ४३ एकर जागेला घालणार कुंपण

नाशिक : सामाजिक बांधिलकी म्हणून पर्यावरण रक्षणासाठी क्रेडाईने पुढाकार घेत फाशीच्या डोंगर परिसरातील वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदविला आहे. नाशिक क्रेडाई, वन विभाग व आपला पर्यावरण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण रक्षणासाठी सातपूर येथील वन कक्ष क्र. २२२ (फाशीचा डोंगर) या ४३ एकर जागेला कुंपण बांधून देण्यासाठीचे भूमिपूजन केले.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकसहभागातून या परिसरात दहा हजार वृक्षारोपण करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहेत. त्याकरिता वनक्षेत्राच्या चहुबाजूने चेनलिंग कुंपण बांधण्यात येणार असून, त्याकरिता अंदाजे ८ ते १० लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. दरम्यान, वृक्षारोपणासाठी खड्डे बनविण्याचे काम प्रगती पथावर असून, आतापर्यंत साधारणत: सहा हजारांपेक्षा अधिक खड्डे खोदण्यात आले आहेत. याठिकाणी वर्षभर पक्षांचा अधिवास राहावा याकरिता फळवृक्षांचे रोपण व संवर्धन केले जाणार आहे. तसेच छोटेसे बटर फ्लाय गार्डनही विकसित करण्यात येणार असल्याचे नाशिक क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी सांगितले. याकरिता विपश्यना केंद्र यांनी तीन इंच पाइपलाइन करण्याची जबाबदारी स्वीकारल्याने वृक्षांची तथा उद्यानाची देखभाल करणे शक्य होईल. दरम्यान, याप्रसंगी नगरसेवक दिनकर पाटील, पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड, वनपाल वाघ, वनरक्षक देवरे, क्रेडाईचे उपाध्यक्ष अभय तातेड, अमोल पाटील, रमेश अय्यर, अमित रोहमारे, कृणाल पाटील, शंतनु देशपांडे, हितेश पोतदार, अमोल सावंत, सुनील गवादे, मयूर कपाटे आदि उपस्थित होते.