शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

इंदिरानगर पोलीस ठाणे : देवयानी फरांदे यांच्यासह २००मोर्चेकऱ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:22 PM

महिला, पुरुषांनी एकत्र येऊन इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या दिशेने मोठ्या संख्येने धाव घेतली. यामुळे त्वरित पोलीस ठाण्यात उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखातेदेखील पोहोचले होते.

ठळक मुद्देबेकायदेशीर जमाव जमविल्याचा ठपकादवाखान्यातील साहित्यांची तोडफोडविनयभंगाच्या गुन्ह्यात डॉक्टरलाही ताब्यात घेण्यात आले

नाशिक : वडाळागावातील सादिकनगरमधील एका खासगी दवाखान्यात बळजबरीने घुसून डॉक्टरला दमबाजी व मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित इरफान शेख ऊर्फ चिपड्या यास पोलिसांनी मंगळवारी (दि.२२) ताब्यात घेतले. यामुळे या भागातील रहिवासी महिला, युवकांनी थेट इंदिरानगर पोलीस ठाण्यातवर धडक दिली होती. या मोर्चामध्ये आमदार देवयानी फरांदेदेखील अग्रभागी होत्या हे विशेष! साथरोग कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे जमाव जमविल्याप्रकरणी संशयित फरांदे यांच्यासह सुमारे दोनशे मोर्चेकऱ्यांविरुध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सादिकनगर येथील एका पीडित विवाहितेसोबत चुकीचे वर्तन केल्याच्या संशयावरून संशयित इरफान व त्याच्या साथीदारांनी दवाखान्यात बळजबरीने प्रवेश करत धुडगूस घातला होता. यावेळी दवाखान्यातील साहित्यांची तोडफोड करत डॉक्टर मुश्ताक शेख यांना मारहाण करण्यात आली होती. शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित इरफानसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच पीडितेच्या फिर्यादीनुसार विनयभंगाच्या गुन्ह्यात डॉक्टर शेखलाही ताब्यात घेण्यात आले.दरम्यान, मंगळवारी सकाळी संशयित इरफान यास अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर हे कर्मचाऱ्यांसह सादिकनगरमध्ये गेले असता पोलिसांना पाहून इरफानने पळ काढण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनीही त्याचा पाठलाग केला. पळत असताना पायाला दगड लागल्याने तो रस्त्यावर पडला आणि पोलिसांनी तत्काळ त्याला धरून वाहनात डांबले. त्यास तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

यानंतर परिसरातील महिला, पुरुषांनी एकत्र येऊन इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या दिशेने मोठ्या संख्येने धाव घेतली. यामुळे त्वरित पोलीस ठाण्यात उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखातेदेखील पोहोचले होते. दरम्यान, पोलिसांनी फरांदे व पंधरा ते वीस महिला मोर्चेकऱ्यांसह सुमारे दोनशे लोकांवर कलम-१८८नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMorchaमोर्चाBJPभाजपाPolice Stationपोलीस ठाणे