नाशिक : जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातच तब्बल ११७ टवाळखोरांवर कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी या आठवड्यातही पुन्हा एकदा मोहीम राबवित शहरातील विविध भागांत एकत्र जमून टवाळखोरी करणाऱ्या जवळपास २५ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.शहर पोलिसांनी अंबड, आडगाव, मुंबई नाका, भद्रकाली व म्हसरूळ या पोलीस ठाण्यांत संशयितांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अंबडमधील प्रकाश बापू कांबळे (२७), प्रकाश देवराम खवळे (२८), संभाजी गजमल पाटील (४०), सुनील नागराज पाटील (४२) यांना मटालेनगरमध्ये असलेल्या जय मल्हार पान स्टॉलजवळ एकत्र जमून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करताना अटक करून जामिनावर सोडून दिले, तर दुसºया घटनेत पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनोद दिलीप पिठे (२५), रमेश मधुकर जाधव, रवींद्र नाना जाधव, संजय काळू पवार या ३८ वर्षीय तिघांसह राम किसन गांगुर्डे (३५) आदींना दुपारी सव्वातीन वाजता तपोवनातील बटुक हनुमान मंदिराजवळ एकत्रितपणे अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत द्वारका सर्कलसमोरील एनडीसीसी बँकेच्या समोर असलेल्या सर्व्हिसरोडवर झालेल्या कारवाईत करण सुरेश साळवे (१९), गोपी भिवा आचारी (२३) वकार साजिद शेख (२४) मेहुल विनोद आगले (२७), मोदीन अन्सार शेख (३६) यांना रात्री १० वाजताच्या सुमारास गोंधळ घालताना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल के ला. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आसिफ बशीर मेमन (४२), अनिलसिंग नायक (२७), तेजस विजय गायकवाड (२३) नितीन तुकाराम नाठे (२२) व अक्षय विजय राठोड (१९) या संशयितांना भद्रकालीतील तलावडी येथे सार्वजनिक शांततेचा भंग करताना मिळून आल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.भद्रकालीतील तलावडीतच दुसºया घटनेत रात्री पावणेनऊ वाजता ओमकार कृष्ण गायकवाड (२६), कमर अन्वर शेख (३२), सुशील सुधाकर यशवंते (३०), अजय गांधी बागमार (२१), राजिंद्र त्रिभुवन यादव (३६) व रंजित अशोक भिसे (५४) यांना सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग व पोलीस आयुक्तांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हेगारांवर जरब बसणारबुधवारी दिवसभर केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या या सर्व आरोपींना जामिनावर सोडण्यात आले असले तरी त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी पोलिसांची कारवाई निश्चिच फायदेशीर ठरेल, असे मत नाशिककरांनी व्यक्त केले आहे.
टवाळखोरी करणाऱ्या २५ जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:53 PM
जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातच तब्बल ११७ टवाळखोरांवर कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी या आठवड्यातही पुन्हा एकदा मोहीम राबवित शहरातील विविध भागांत एकत्र जमून टवाळखोरी करणाऱ्या जवळपास २५ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
ठळक मुद्देकारवाई : पोलिसांकडून आठवडाभरात पुन्हा मोहीम