पांगरी : शेतकऱ्याविरोधात फिर्यादसिन्नर : कमी क्षेत्र दाखवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाकडून विहीर योजनेचा लाभ घेतल्याप्रकरणी पांगरीच्या एका शेतकऱ्याविरोधात वावी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २ हेक्टर क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्यांना या योजनाचा लाभ मिळतो. मात्र, पांगरी येथील भाऊसाहेब छबू आवारी यांनी स्वत:ची सात हेक्टर ६८ आर जमीन असताना केवळ १ हेक्टर ७६ आर जमीन दाखवली. जमिनीची माहिती लपवून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बिब्बे यांच्या फिर्यादीहून भाऊसाहेब आवारी याने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे, हवालदार संदीप शिंदे अधिक तपास करीत आहे. (वार्ताहर)
शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा
By admin | Published: October 15, 2016 1:40 AM