मालेगाव : इंधन दरवाढीविरोधात शुक्रवारी काढण्यात आलेल्या सायकल फेरीप्रकरणी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यासह महागठबंधनच्या नगरसेवकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस कर्मचारी विलास सूर्यवंशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे जनतेला महगाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली मुशावरत चौक येथुन सायकल फेरी काढण्यात येऊन तहसीलदार राजपूत यांना निवेदन देण्यात आले होते.याप्रकरणी परवानगी न घेता कार्यकर्त्यांची गर्दी केली. सोशल डिस्टन्स न ठेवता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवमानता केली. या आरोपावरून आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, नगरसेवक एजाज बेग, मोहम्मद मुस्तकिम डिग्निटी, मोहम्मद आमीन मोहम्मद फारुख, युसुफ इलियास, मौलाना अतहर हुसैन अशरफी, हाफीज अब्दुला यांच्यासह एमआयएम व जनता दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
मालेगावी आमदारासह नगरसेवकांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:54 AM
इंधन दरवाढीविरोधात शुक्रवारी काढण्यात आलेल्या सायकल फेरीप्रकरणी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यासह महागठबंधनच्या नगरसेवकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी विलास सूर्यवंशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
ठळक मुद्देतक्रार : सायकल फेरी काढल्याचा आरोप