महाड येथील एका पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे शहरातील शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणे यांच्याविरुध्द पोलिसांकडे तक्रार केली. गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्यापकता लक्षात घेत राणे यांना राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अटक करणे योग्य होईल, अशी खात्री पटल्यानंतर तत्काळ पथकाला रत्नागिरीच्या दिशेने रवाना करण्यात आले. या पथकाचे प्रमुख पोलीस उपायुक्त बारकुंड यांना नेमण्यात आले आहे, असे पाण्डेय यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिपदावर राणे असल्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करताना सर्व प्रोटोकॉलदेखील पाळण्याचे आदेश पथकाला दिल्याचे पाण्डेय म्हणाले.
--इन्फो---
..अशी आहेत गुन्ह्यांची कलमे
फिर्यादी सुधाकर भिका बडगुजर यांच्या तक्रारीवरून राणे यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भादंवि कलम ५००, ५०५(२), १५३-ब (१) (क), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन गटांत, समूहात वितुष्ट निर्माण होईल या उद्देशाने चिथावणीखोर वक्तव्य करणे, धमकावणे, अब्रु नुकसान करणे याचा समावेश आहे.
---इन्फो--
...असा राहिला घटनाक्रम
सोमवारी मध्यरात्री ११:३०वा. - बडगुजर यांची राणेंविरुद्ध तक्रार.
मध्यरात्री १:३०वा. नारायण राणेंविरुद्ध सायबर पोलीस ठाण्याच गुन्हा दाखल
पहाटे ५:३०वा. नाशिक पोलिसांचे खास पथक महाडच्या दिशेने रवाना
संध्याकाळी ६:४५वा. पथक संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल
रात्री उशिरा पथक महाड पोलीस ठाण्यात पोहोचले.
-----
...असे आहे पथक
पथकप्रमुख : संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त (गुन्हे)
पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, अजय शिंदे ( गुन्हे शाखा युनिट-१/२)
२ सहायक निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट-१/२ आणि मध्यवर्ती शाखेचे मिळून एकूण १६ पोलीस कर्मचारी.
--कोट---
राणे यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा नाशिकमध्ये दाखल झाला. त्यानंतर महाड पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली; मात्र पहिला गुन्हा नाशकात दाखल झाल्याने राणे यांचा ताबा महाड पोलिसांकडून सर्व कायदेशीर प्रक्रिया व प्रोटोकॉलचे पालन करून घेतला जाणार आहे. त्यानंतर त्यांना नाशकात जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
- संजय बारकुंड, उपायुक्त (गुन्हे शाखा)
240821\24nsk_39_24082021_13.jpg
कोट मध्ये वापरावासंजय बारकुंड