नाशिक : रजा मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावे बनावट स्वाक्षरीचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून फसवणूक करणाºया जिल्ह्यातील दोघा महिला शिक्षकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.श्रीमती पल्लवी मुरलीधर कापडणीस व श्रीमती रंजना भास्कर महाले अशी या दोन्ही शिक्षकांची नावे असून, कापडणीस ह्या नंदुरबारहून आंतरजिल्हा बदलीने नाशिक जिल्हा परिषदेत हजर झाल्या होत्या. त्यांना मालेगाव तालुक्यातील सांजवहाळ येथे नेमणूक देण्यात आली होती; परंतु कापडणीस तेथे हजर झाल्या नाहीत, त्या गैरहजर राहिल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली असता, त्यांनी वैद्यकीय कारणास्तव रुजू होऊ शकले नसल्याचा दावा केला होता व त्यासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांचा दाखला सोबत जोडला होता. दरम्यानच्या काळात त्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील शाळेत रुजू झाल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सदरच्या वैद्यकीय दाखल्याची जिल्हा शल्य चिकित्सकामार्फत खातरजमा केली असता, तेथील वैद्यकीय अधिकारी कापडणीस यांना एमएलसी केसेस, वैद्यकीय प्रमाणपत्रे व शवविच्छेदन करण्याचे अधिकारच नसल्याचे त्याचबरोबर त्यांनी सदरचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिलेले नसल्याचे चौकशीत उघड झाले. कापडणीस यांनी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर सटाणा ग्रामीण रुग्णालयाचा शिक्का असल्याने त्याची खात्री केली असता, सदरचा शिक्कादेखील बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मालेगावच्या गटशिक्षणाधिकाºयांना पत्र देऊन कापडणीस यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.बंद झालेल्या हॉस्पिटलचे प्रमाणपत्रअसाच प्रकार रंजना भास्कर महाले ह्यादेखील आंतरजिल्हा बदलीने सिंधुदुर्ग येथून नाशिक जिल्हा परिषदेत बदलून आल्या असता, त्यांना दिंडोरी तालुक्यातील बोरवणपाडा येथे नियुक्ती देण्यात आली; परंतु त्या हजर झाल्या नाहीत, नंतर त्यांची हस्ते दुमाला येथे बदली करण्यात आली; परंतु दरम्यानच्या काळात त्या गैरहजर असल्याने त्यांना नोटीस बजावली असता त्यांनी पंचवटीतील डॉ. कृष्णागिरी श्री साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राची चौकशी केली असता, सदरचे हॉस्पिटल दहा वर्षांपूर्वीच बंद झाल्याचे स्पष्ट झाले.
खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:36 AM
रजा मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावे बनावट स्वाक्षरीचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून फसवणूक करणाºया जिल्ह्यातील दोघा महिला शिक्षकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेची कारवाई : फसवणूक केल्याची भावना