नाशिकरोड : जेलरोड साने गुरुजी नगर आरंभ महाविद्यालय येथून जाणाऱ्या युवतीशी गैरवर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जेलरोड येथील युवती शनिवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून आरंभ महाविद्यालय येथून जात असताना ओळखीचे संशयित ओमकार जगताप, प्रशांत शिंदे यांनी युवतीला थांबवून तिला स्पर्श करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. संबंधित युवतीने तिचे ज्या युवकाशी लग्न ठरले आहे त्याला बोलवून घेतले असता ओमकार व प्रशांत यांनी अजून गैरवर्तन केले. त्यानंतर ती युवती व ज्या मुलासोबत लग्न ठरले आहे असे दोघे पुन्हा सायंकाळी जात होते. यावेळी संशयित ऋषिकेश चौधरी याने पुन्हा त्या युवतीशी गैरवर्तन करत विनयभंग केला. याप्रकरणी संशयित ओमकार जगताप, प्रशांत शिंदे, ऋषिकेश चौधरी या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
युवतीचा विनयभंग प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 1:02 AM