ठळक मुद्देतिघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मालेगाव : येथील भाजीपाला आडत व्यावसायिक विवेक वारूळे यांना विनाकारण शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याचा दम देणाºया तिघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवेक वारूळे यांनी फिर्याद दिली आहे.धर्मा लुकडू वारूळे, स्वप्नील धर्मा वारूळे, सुमन धर्मा वारूळे सर्व रा. सावतानगर यांनी विनाकारण शिवीगाळ व जीवे ठार मारण्याचा दम दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार बाळकृष्ण पजई हे करीत आहेत. दरम्यान, आपसातील भाऊबंदकीच्या वादातून छावणी पोलीस ठाण्यात आपल्या विरोधात फिर्याद देवून बदनामी केली असल्याचे विवेक वारूळे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.