नाशिक : शहरात टोइंग व वाहतूक पोलिसांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना उमटत असताना वाहन टोइंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास विरोध करणाºया महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.टोइंग करणारे कर्मचारी व कंत्राटदाराविरोधात नागरिकांच्या तीव्र भावना असताना नागरिकांच्या तक्रारींना दाद न देणाºया वाहतूक पोलिसांनी टोइंग केलेले वाहन सोडविण्यासाठी दंडाची पावती फाडण्यास विरोध करणाºया कुसुम भगवान पाटील (४२) व सुरेखा संतोष सौंदाणे (४२) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक शाखेच्या गेटवर गुरुवारी (दि.२) दुपारी दोन वाहतूक शाखेचे कर्मचारी सुनील उगले कर्तव्यावर असताना याठिकाणी आणलेले चारचाकी वाहन (क्र.एमएच १५ एफएफ ६४६९) नो पार्किंगमध्ये असल्याने टोइंग करून आणण्यात आले होते. हे वाहन दोन्ही महिला घेऊन जात असताना उगले यांनी त्यांना विचारणा केली; परंतु महिलांनी त्यांना दाद न देता दंडाची रक्कम भरून पावती घेण्यास विरोध केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोइंगचा दंड भरण्यास विरोध करणाऱ्या महिलांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 1:23 AM