सिडको : सदनिकांची संपूर्ण रक्कम घेऊनही खरेदीखत, साठेखत, पूर्णत्वाचा दाखला, सोसायटी भोगवटा प्रमाणपत्र याबरोबरच दुरुस्ती खर्चाची रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विराज लोमटे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मुकुल यशवंत करंडे (रा. डी.जी.पी.नगर, अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोमटे यांनी सुवास्तु अपार्टमेंट बांधले आहे. लोमटे यांनी रहिवाशांना अद्यापही सदनिकांची आवश्यक कागदपत्रे दिलेली नाहीत. त्याचप्रमाणे मंजूर नकाशाप्रमाणे इमारतीचे बांधकाम न करता त्यात स्वत:च्या मर्जीनेबदल केले़ असल्याचे करंडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विराज लोमटे यांच्या विरोधात फसवणूक तसेचमो. फा. कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
लोमटे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 1:24 AM