एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद ठेवली जात असताना दुसरीकडे सरकारमधील मंत्री महोदय चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरतीमध्ये सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद ठेवली जात असताना दुसरकीडे सरकारमधील मंत्री महोदय आव्हाड यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरती केली. यामुळे भाविकांसाठी वेगळा अन् मंत्र्यांसाठी वेगळा नियम असतो का, असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला गेला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा जागी झाली खरी. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना वगळून अन्य पाच संशियतांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
--इन्फो--
यांच्याविरु्ध कलम-१८८ नुसार कारवाई
पोलीस आयुक्त तथा अपर दंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग, तसेच भादंवि कलम-१८८, २६९ नुसार संशयित योगेश नामदेव दराडे (३३), स्वप्नील प्रभाकर चिंचोले (२९, दोघे रा. आश्विननगर, सिडको), विक्रांत उल्हास सांगळे (२९), संतोष पांडुरंग काकडे (३५), आनंद बाळिबा घुगे (३३, रा. सर्व मोरवाडी, सिडको) या पाच संशयितांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक धाबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.