याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आशेवाडी ग्रामपंचायतीत १५ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१ दरम्यान विविध विकासकामांसाठी आलेला शासकीय निधी त्यासाठी न वापरता ग्रामसेवक दिलीप वामनराव मोहिते (रा.साकोरे मिग), सरपंच श्रीमती जिजाबाई कचरू तांदळे व उपसरपंच श्रीमती सुनीता संजय बोडके (रा. आशेवाडी) या तिघांनी त्यांचे ओळखीच्या चार इसमांचे नावे धनादेश,आरटीजीएसच्या माध्यमातून ३७ लाख ३० हजार ८९ रुपये अदा केली. त्यानंतर ती रक्कम पुन्हा त्या इसमांचे खात्यातून काढून घेत तिघांनी संगनमत करत अपहार केल्याची तक्रार पंचायत समिती दिंडोरीचे विस्ताराधिकारी आण्णा किसन गोपाळ यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली आहे. दिंडोरी पोलिसांनी तिघांविरोधात भा.दं. वि. कलम ४०३,४०८, ४०९, ४२० व ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कौठे अधिक तपास करत आहेत.
===Photopath===
140521\screenshot_20210514_160921.jpg
===Caption===
रासेगाव अपहार प्रकरण एफआयआर