नाशिक : द्वारका येथील जानकी प्लाझा संकुलाच्या तीसऱ्या मजल्यावरील टेरेसवर संबंधितांनी बांधलेल्या अनधिकृत पाण्याच्या हौदातून होणाऱ्या गळतीमुळे सुनील खोडे बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स यांच्या कार्यालयात शॉर्टसर्किट होऊन आगीचा भडका उडाला होता. याप्रकरणी अखेर मुंबईनाका पोलीस ठाण्यात संबंधित संशयित बांधकाम व्यावसायिकांवर तीन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जानकी प्लाझाच्या दुसऱ्या मजल्यावरील फिर्यादी सुनील खोडे यांचे कार्यालयाला ३१मार्च रोजी सकाळी भीषण आग लागली होती. आगीमध्ये कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक होऊन सुमारे २० लाखांचे नुकसान झाले होते. या दुर्घटनेला मधुर बिल्डवेल कंपनीचे संचालक जबाबदार असल्याचा ठपका खोडे यांनी ठेवला होता. मागील वर्षीच हौदाच्या पाण्याची गळती कार्यालयाच्या छतातून आतमध्ये होत असल्याचे खोडे यांनी चेतन पटेल, अरविंद पटेल, प्रदीप पटेल यांच्या लक्षात आणून दिले होते; मात्र संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मार्च महिन्यात आगीची दुर्घटना घडल्याचे खोडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी कमकुवत कलम लावले असून याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे खोडे यांनी सांगितले.मनपा, महावितरणकडून चौकशी अहवालमनपा विभागीय अधिकारी यांनी मुंबईनाका पोलिसांकडे सादर केलेल्या परिक्षण अहवाल आणि भारतीय विद्युत अधिनियम२००३च्या कलम१६१नुसार महावितरणच्या विद्युत निरिक्षकांनी दिलेल्या चौकशी अहवाल आणि खोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कार्यालय जळून २0 लाखांचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित तीघा पटेल व्यावसायिकांविरुध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखेर गुन्हा दाखल : हौदाच्या गळतीमुळे आगीचा भडका; २०लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 7:56 PM
पोलिसांनी गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी कमकुवत कलम लावले असून याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे खोडे यांनी सांगितले.
ठळक मुद्देखोडे बिल्डर कार्यालय जळीत प्रकरणमनपा, महावितरणकडून चौकशी अहवाल