ठळक मुद्देशहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : वारंवार पैशांची मागणी करून फिर्यादीच्या पतीस व कुटुंबीयांना वेळोवेळी खोटी फिर्याद दाखल करून जेलमध्ये टाकण्याचा दम दिल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून दीपक लोंढे यांनी २२ जुलै रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी मोहिनी सकट, संजीवन वाघ, सोनू गणेश कांबळे, शंकर मोहन हातांगळे, रेणाबाई दिलीप हातांगळे,मीनाबाई मोहन हातांगळे, सुरेश विष्णू हतांगळे, (सवर्, रा. स. नं. ५५ यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.मायाबाई दीपक लोंढे यांनी फिर्याद दिली. अधिक तपास उपनिरीक्षक वसावे करीत आहेत.