लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी आणि घरफोडीची उकल करण्यात पोलिसांना अपयश आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर, वडाळागाव, राजीवनगर, पाथर्डीगाव, वडाळ-पाथर्डी रस्तालगतचे विविध उपनगरे आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीत वाढ झाली आहे. यामध्ये रात्री जेवण झाल्यानंतर फेरफटका मारणाऱ्या महिलांच्या अंगावरील सोनसाखळी ओरबडणाच्या सुमारे चार ते पाच घटना घडल्या आहेत. तसेच राजीवनगरमध्ये भरदिवसा घराचे कुलूप बनावट चाबीने उघडून त्यामधील सोन्या-चांदीचे सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना ताजी असतानाच सायकल विक्री व दुरुस्तीचे दुकान फोडून सुमारे ६५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. एका मागून एका गुन्हेगारांची घटना घडत आहेत. परंतु अद्यापपर्यंत एका गुन्हाची उकळ करण्यास पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवरच प्रश्न निर्माण केला जात आहे. गुन्हेगारांना पकडण्याऐवजी सकाळी आणि सायंकाळी नाकाबंदी करून हेल्मेट आणि सिटबेल्ट न लावणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईवर जोर दिला जात आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम पोलीस केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीत वाढ
By admin | Published: June 23, 2017 12:07 AM