-विजय मोरे
नाशिकवाढते शहरीकरण, एकत्रित कुटुंबपद्धतीचा -हास, चित्रपट, मोबाइलवरील विविध सोशल साइटचे वाढते प्रस्थ यामुळे शहरासह ग्रामीण भागातील तरुणाई सैराट झाली आहे़ १ जून २०१६ ते ५ जून २०१८ या ३० महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहरातून एक हजार ४२१ स्त्रिया / तरुणी, तर नाशिक ग्रामीणमधून एक हजार ५५६ स्त्रिया / तरुणींनी घरातून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते तथा आरटीआय कार्यकर्ते महेंद्र मिसर यांना दिली आहे़ यामध्ये प्रेम प्रकरण,लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे बदनामीच्या भीतिपोटी काही पालक तक्रार देत नसल्याची शक्यता अधिक आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यात विविध कारणांनी घरातून पलायन करणाऱ्या १८ ते २५ या वयोगटातील तरुण / तरुणींची संख्या सर्वाधिक आहे़ तर, त्या खालोखाल विवाहित स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. मोबाइल हा प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग झाला. यामध्ये तरुणाई सर्वाधिक वेळ सोशल नेटवर्किंग साइटवर खर्च करतात़ या सोशल मीडियातील ओळखीतून प्रेम प्रकरण सुरू होते आणि घर सोडून जाण्याचे वा मुलासोबत पळून जाण्याचे प्रकार सुरू होतात़ विशेष म्हणजे पळून गेलेल्या तरुणी काही दिवसांतच परतल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण होतो़पौगंडावस्थेतील शारीरिक आकर्षण, प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचे आमिष दाखवून मुलींची वा महिलांची फसवणूक केल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत़ कुटुंबांचा विरोध डावलून पळून जाण्याचे प्रकार वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
'शहरातून बेपत्ता झालेल्यांची आकडेवारी वर्ष हरविलेले, पळविलेले पुरुष / तरुण हरविलेले, पळविलेले महिला / तरुणीपुरुष मिळाले अल्प मुले मिळाले महिला मिळाले अल्प मुली मिळाले २०१६ २०९ -- ५९ -- -- ३४४ -- ७५ २०१७ ६४५ ५४९ ४७ ४१ ७३० ६५२ २६३ १५४ २०१८ २८४ २१० २८ २४ ३४७ २८६ ८४ ६४ एकूण ११३८ ७५९ ७५ ६५ १४२१ ९३८ ३२२ २१८जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्यांची आकडेवारी वर्षे तरुण / पुरुष स्त्री/तरुणीं अल्पवयीन मुले अल्पवयीन मुली मुली १८ वर्ष बलात्कार / विनयभंग / हुंडाबळी २०१६ २०९ ३४४ ५९ ७५ -- ३३६२०१७ ८६ ७९१ २९ ५० ८० ११९ २०१८ -- ४२१ -- -- ५४ --एकूण -- १५५६ -- -- १३४ --
संघर्ष नको, संवाद हवानाशिक, औरंगाबाद, नागपूर, पुणे, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबई महानगरातील विविध महाविद्यालयांत महिला सुरक्षा, अत्याचार, प्रेम, प्रेमातून होणारी फसवणूक, साइबर गुन्हे, कुटुंब व्यवस्था या विषयांवर समाजसेवी, शासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील यांना निमंत्रित करून मार्गदर्शन केले जात असल्याची मोहीम सुरू केली आहे. - महेंद्र मिसर, सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ते, मनमाड
आॅपरेशन मुस्कानहरवलेली मुले शोधण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत आॅपरेशन मुस्कान राबविण्यात येते़ बालकांच्या शोधासाठी जुलै २०१५ ते जुलै २०१७ या कालावधीत चार ‘आॅपेरशन मुस्कान' राबविण्यात आले होते. त्यामध्ये हरवलेल्या एकूण बालकांपैकी एक हजार ६१३, तर २०१७ मध्ये ६४५ बालकांचा शोध पोलिसांनी लावला आहे.