मालेगाव येथील टेलिकॉम अभियंता व ठेकेदार अंबादास रघुनाथ चौधरी यांना व्यवसायासाठी ५ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आरोपी कमलेश टिकमदास तेजवाणी याने आमिष दाखविले. भूलथापा देऊन कर्ज प्रकरणासाठी प्रोसेस फी म्हणून ४६ लाख रुपये फिर्यादीकडून बँक खात्यामार्फत मिळवून रक्कम हडप केली. मात्र कर्ज मंजूर करून दिले नाही. उलट आरोपीने वेळोवेळी राहत्या घराचा व कार्यालयाचा पत्ता बदलला.
आरोपीने खोटे आमिष दाखवून आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. अपर पोलीस अधीक्षक आणि छावणी पोलिसातही लेखी तक्रार दिली होती. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती ए. एम. तांबे यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. त्यानुसार छावणी पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे ॲड. सुधीर अक्कर यांनी कळविले आहे.