शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धक्कादायक! बायकोला सासरी पाठवत नसल्याने जावयाकडून सासूचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 1:14 PM

घोटी : विनाकारण मारहाण करतो म्हणून सासरी येण्यास टाळाटाळ करणाऱ्या पत्नीच्या माहेरी रविवारी (दि.२२) सकाळी पती-पत्नीत शाब्दिक बाचाबाची झाली. ...

घोटी : विनाकारण मारहाण करतो म्हणून सासरी येण्यास टाळाटाळ करणाऱ्या पत्नीच्या माहेरी रविवारी (दि.२२) सकाळी पती-पत्नीत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामधून भांडण पराकोटीला जाऊन रागाच्या भरात पतीने विळ्याने बायकोला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सासू मुलीला सोडविण्यासाठी गेली असता, जावयाने त्यांच्यावरही हल्ला चढवत पोटात व पाठीत कात्री भोसकल्याने सासू जागीच गतप्राण झाली, तर पत्नी आणि एक अल्पवयीन मुलगी या गंभीर जखमी झाल्याची घटना त्र्यंबकेश्वर सीमेवरील झारवड येथे घडली आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी पकडून ठेवलेल्या जावयास पोलिसांनी ताब्यात देऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

इगतपुरी-त्रंबकेश्वर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या झारवड, जोशीवाडी येथे रविवारी सकाळी ९. ३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात कमळाबाई सोमा भुतांबरे (५५) रा.जोशीवाडी, झारवड ता.त्र्यंबकेश्वर ही वृद्ध महिला जागीच ठार झाली. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुबाई किसन पारधी (३६), रा.कळमुस्ते, जांभूळवाडी, ता.त्र्यंबकेश्वर हि विवाहित महिला आपली १२ वर्षीय मुलगी माधुरी हिस सोबत घेऊन काही दिवसांपूर्वी माहेरी झारवड येथे आली होती. दरम्यान, पतीला दारूचे व्यसन असल्याने ती सासरी जाण्यास टाळाटाळ करत होती. रविवारी सासरी आलेल्या जावयाने सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पत्नीला घरी येण्याबाबत आग्रह केला. याचदरम्यान पती-पत्नीत भांडण झाले. यावेळी पती किसन महादू पारधी (४२) रा.कळमुस्ते, जांभूळवाडी, ता.त्र्यंबकेश्वर याचा राग अनावर झाला. त्याने विळ्याने पत्नी इंदुबाई हिस मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, सासू कमळाबाई व मुलगी माधुरी पारधी या भांडण सोडविण्यास गेल्या असता, किसन पारधी याने कमळाबाई यांच्या पोटात व पाठीवर कात्रीने भोसकून वार केले. त्यात कमळाबाई गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत आरडाओरड होताच, परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन संशयित किसन महादू पारधी यास पकडून ठेवले व घोटी पोलिसांना खबर दिली. जखमी अवस्थेत पडलेल्या इंदुबाई व माधुरी यांना तत्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.

खुनाचा गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची व परिस्थितीची माहिती घेऊन तपास कामी सूचना दिल्या. घोटी पोलिसांनी बाळा निवृत्ती भुतांबरे (२७) याच्या फिर्यादीवरून संशयित किसन महादू पारधी याच्याविरुद्ध खून, जीवे मारण्याचा प्रयत्न आदी कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती श्रद्धा गंधास यांच्यासह हवालदार कोरडे, शीतल गायकवाड, रवी जगताप सदगीर आदी करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक