शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

गुन्हा दाखल : जिल्हा व सत्र न्यायालयातून खटल्याची मुळ फिर्याद गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 6:46 PM

मिसर यांनी सदर बाब न्यायाधिशांच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधिश शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खटला सत्र न्यायालयाकडून हे प्रकरण जिल्हा न्यायाधीश पी.आर.देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. मुळ तक्रारीच्या मजकुरातही फेरफार

नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागातील निलंबित कार्यकारी अभियंत्याच्या लाच प्रकरणाच्या खटल्याच्या कामकाजाची फाईल न्यायालयाकडे सुपुर्द करताना विशेष सरकारी वकिल यांनी ती चाळली असता त्यामध्ये मुळ फिर्यादचे दस्तऐवज गहाळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्याऐवजी बनावट कागदपत्र अज्ञातांनी फेरफार क रुन फाईलमध्ये ठेवल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे यांनी गंभीर दखल घेत अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास सुरू केला आहे.बांधकाम विभागाचे निलंबित अभियंता सतीश मधुकर चिखलीकर यांच्यासह शाखा अभियंता जगदीश वाघ यांना २०१३ साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारताना ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांच्या निवासस्थानांची झडती घेतली असता कोट्यवधींचे घबाड हाती आले होते. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केले होते. सरकार पक्षाकडून अ‍ॅड. अजय मिसर कामकाज चालवित होते. दरम्यान, या खटल्यात संशयितांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मिसर यांनी या खटल्याची फाईल न्यायालयाकडे सुपुर्द करण्यापुर्वी पडताळून बघितली असता त्यामध्ये फिर्यादी इरफान यासीन शेख याची स्वाक्षरी असलेले दस्तऐवज गहाळ असल्याचे निदर्शनास आले. तसेच पंचाची साक्ष असलेल्या दस्तऐवजांवर कुठल्याहप्रकारच्या स्वाक्षऱ्या नसल्याचेही आढळले. त्यामुळे मिसर यांनी सदर बाब न्यायाधिशांच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधिश शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खटला सत्र न्यायालयाकडून हे प्रकरण जिल्हा न्यायाधीश पी.आर.देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा व प्रधान न्यायालयाच्या आदेशान्वये न्यायालयीन कर्मचारी दिलीप जाधव यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल क रण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक व्ही.ए.शेळके करीत आहेत.मुळ तक्रारीच्या मजकुरातही फेरफारमुळ तक्रारीमधील मजकू रातही फे रफार करुन मजकूर बदलण्याचाही प्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच तक्रारीच्या सही-शिक्का असलेली नकल प्राप्तीसाठी करण्यात आलेल्या अर्जाच्या नोंदवहीतही व्हाईटनरचा वापर करत खाडाखोड केल्याचे पुढे आले आहे. जिल्हा व प्रधान न्यायालयाने ही नोंदवही जप्त केली आहे. याप्रकरणात संशयाची सुई न्यायालयीन कर्मचारी वर्गासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस आणि आरोपीवरही आहे.

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय