नाशिक : शहरात दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू असताना तसेच कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक केलेले असतानासुध्दा विनापरवानगी द्वारका चौका एकत्र येत पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, नगरसेविका समीना मेमन, आशा तडवी यांच्यासह ८५ आंदोलकांविरुध्द मुंबईनाका, भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रयत क्रांती संघटना व भाजपा किसान मोर्चाच्या वतीने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व सदाभाऊ खोत, खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, वाल्मिक सांगळे, गिरिश पालवे यांच्यासह ३० ते ३५ आंदोलकांनी एकत्र येत बैलजोडी आणून घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदविला होता. याप्रकरणी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन तसेच विनापरवानगी आंदोलन केल्यामुळे मुंबईनाका पोलीस ठाण्यात कलम-१८८, २६९, २७० आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार भारती पवार, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सदाभाऊ खोत यांच्याविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 14:29 IST
रयत क्रांती संघटना व भाजपा किसान मोर्चाच्या वतीने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली.
खासदार भारती पवार, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सदाभाऊ खोत यांच्याविरुध्द गुन्हा
ठळक मुद्देआंदोलन भोवले नगरसेविका समीना मेमन, आशा तडवी यांच्याविरुध्द गुन्हा