--
अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : शहरातील आयुष्य नगर भागातून अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्या अज्ञात इसमाविरुद्ध नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यांची पंधरा वर्षे वयाची मुलगी अज्ञात इसमाने पळून नेली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार करीत आहेत.
----------------------
बनावट दस्तऐवज बनवून फसणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : येथील उपनिबंधक कार्यालयात लोणवाडे शिवारातील गट क्रमांक ११८ क्षेत्रामधील पंधरा आर क्षेत्राचे बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक करणाऱ्या सहा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतजमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून तसेच मृत इसम कृष्णा विठ्ठल देवरे यांची बनावट स्वाक्षरी करून सात लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या भरत लक्ष्मण गुंजाळ, चंद्रभागाबाई कृष्णा देवरे, अब्दुल रहिम उमर उल्ला, शेख इमाम शेख गुलाब, मोहिनुद्दीन निजामुद्दीन यांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी मनोहर ऊर्फ मनोज बापू गुंजाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आखाडे करीत आहेत.
---
ट्रकच्या धडकेत कारचालक जखमी
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर मुंगसे शिवारात कारला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात रोशन शांताराम आहिरे, रा. निमगाव हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी अहिरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रकचालकाने (क्र. एमएच ०४ एएफजे ३३२५) कारला (क्र. एमएच ४१ एएस ५७७९) धडक दिली. पुढील तपास तिडके करीत आहेत.
---------------
रस्ता लूट करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाटा शिवारात अज्ञात दुचाकीस्वार भामट्याने तरुणाच्या खिशातील चार हजारांची रोकड, भ्रमणध्वनी असा नऊ हजारांचा मुद्देमाल लुटून नेला आहे. या प्रकरणी शाकीर आतिक बेग यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीवरील (क्र. एमएच ४१ एच ३०२४) अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून खिशातील रोकड व भ्रमणध्वनी चोरून नेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ढुमणे करीत आहेत.