नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी (दि.१०) ८४ नागरिकांवर कारवाई करण्यात आली तसेच मास्कचा वापर टाळणाऱ्या ५२ लोकांविरूध्दही गुन्हे दाखल करण्यात आले.नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हददीत लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडु नये, तसेच अत्यावश्यक कामासाठी गरज भासल्यास बाहेर पडताना तोंडावर मास्क लावावा अस आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत; तरीदेखील मंगळवारी (दि.९) ४७ लोकांनी या आदेशाचा भंग केला होता. बुधवारी ५२ लोकांना या आदेशाचा विसर पडला. यावरून नागरिकांमध्ये कोरोनाविषयीची उदासिनता दिसून येते. त्याचप्रमाणे मंगळवारी संचारबंदी जमावबंदी आदेशाचे पालन न करणा-या ७४ लोकांवरही कारवाई करण्यात आली होती. यामध्येही बुधवारी १० महाभागांची अजून भर पडली. २२ मार्चपासून अद्यापपर्यंत भारतीय दंडविधान कलम १८८नुसार २ हजार ६२७ लोकांविरूध्द कारवाई केली गेली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती आयुक्तालयाच्या सुत्रांनी दिली आहे. नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या सर्व सुचनांचे पालन करत उपाययोजना करणे अनिवार्य असल्याचे नांगरे पाटील म्हणाले.
गुन्हे दाखल : संचारबंदीचे उल्लंघन ८४ लोकांना भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 6:55 PM
मंगळवारी (दि.९) ४७ लोकांनी या आदेशाचा भंग केला होता. बुधवारी ५२ लोकांना या आदेशाचा विसर पडला. यावरून नागरिकांमध्ये कोरोनाविषयीची उदासिनता दिसून येते.
ठळक मुद्देमास्कचा वापर टाळणाऱ्या ५२ लोकांविरूध्दही गुन्हे