पेठ - लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेचे सबळ कारण नसताना फिरणाऱ्या नागरिक तसेच वाहनधारकांवर पेठ पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत असून मे महिन्यात जवळपास ४० वाहनधारकांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात पाच मोठी वाहने जप्त करण्यात आली असून पोलीस विभागाने विनाकारण फिरणाऱ्यांकडून ३ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पेठचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेठ पोलीस अत्यावश्यक सेवेशिवाय फिरणारे नागरिक, व्यावसायिक व वाहनधारकांवर करडी नजर ठेऊन आहेत.
करंजाळीत दंडात्मक कारवाई
स्थानिक स्वराज्य संस्था पथक व पोलीस विभाग यांच्या संयुक्त कारवाईत करंजाळी येथे ४१ विनाकारण फिरणारे नागरिक व वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून ३ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी दिलेल्या आदेशानुसार कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी कडक निर्बंध जारी केले असून नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडू नये.
-रामेश्वर गाडे, पोलीस निरीक्षक पेठ
पेठ शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करतांना पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे. (१९ पेठ १)
===Photopath===
190521\19nsk_8_19052021_13.jpg
===Caption===
१९ पेठ १