नाशिक : नाशिक महानगरपालिकेची परवानगी न घेताच स्वत:च्या व्यवसायाची जाहिरातबाजी करणाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विनापरवाना व्यवसाय झळकविणा-यांविरुद्ध पालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली असून, त्यानुसार मनपाच्या वतीने म्हसरूळ, गंगापूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंचवटी विभागीय कार्यालयाचे दिलीप तांदळे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी मखमलाबाद रोडवरील काकडमळा परिसरात पीयूष पटेल, संजय पटेल या दोघांनी मनपाची पुर्व परवानगी न घेता त्यांच्या घराची जाहिरात फलकाद्वारे केली. तसेच अशोक बोरसे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताने एबीबी सर्कलवर बेकायदेशीर बॅनर लावून शहर विद्रुपीकरण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. शेखर कावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डोंगरे वसतिगृह, मॅरेथॉन चौक येथील क्लासचालक प्रा. वंदू नाना दराडे यांच्यासह एका वैद्यकीय क्षेत्रासंबंधी व क्लासचालकाविरोधात बेकायदेशीर बॅनर लावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फौजदारी गुन्हे : शहराचे विद्रुपीकरण कराल तर खबरदार...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 5:04 PM
मनपाच्या वतीने म्हसरूळ, गंगापूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देक्लासचालकाविरोधात बेकायदेशीर बॅनर लावल्याबद्दल गुन्हाम्हसरूळ, गंगापूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल