नाशिक : पदवीधर प्राथमिक शिक्षकाचे मूळ सेवापुस्तक गहाळ केल्याप्रकरणी सुरगाणा येथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ सहायकाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी निफाड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले.सुरगाणा पंचायत समितीमध्ये कार्यरत असेलेले वरिष्ठ सहायक सुनील महाजन हे निफाड पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागात कार्यरत असताना त्यांच्याकडे आस्थापनेचा कार्यभार होता. त्यांची सुरगाणा येथे बदली झाल्यानंतर त्यांनी आपल्याकडील कार्यभार देताना सर्व बाबींचे हस्तांतर करणे आवश्यक होते; मात्र निफाड तालुक्यात कार्यरत असलेल्या एका पदवीधर प्राथमिक शिक्षकाचे मूळ सेवापुस्तक त्यांनी हस्तांतर केले नाही, याबाबत त्यांना पाच वेळा कारणे दाखवा नोटीस देऊनही त्यांनी सदरचे पुस्तक जमा केले नाही व समाधानकारक खुलासा सादर केला नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाºयास फौजदारी कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती; मात्र समाधानकारक खुलासा सादर न केल्याने त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यासाठी निफाड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.दुय्यम मूळ सेवापुस्तक करण्याची परवानगीसंबंधित पदवीधर प्राथमिक शिक्षकाचे दुय्यम मूळ सेवा पुस्तक तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सेवापुस्तक हा जतनीय दस्तऐवज असून, मुंबई वित्तीय नियम १९५९ मधील नियम ५२ खालील परिशिष्ट १७ नुसार सेवा पुस्तक हे प्रदीर्घ कालावधीपर्यंत जतन करण्याची जबाबदारी सदर काम करणाºया कर्मचाºयांची आहे; मात्र अशाप्रकारे कुणी याबाबत हलगर्जीपणा करणार असेल तर त्याच्यावर कार्यवाही करण्याचा इशाराही डॉ गिते यांनी दिला आहे.
वरिष्ठ सहायकाविरुद्ध फौजदारीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:25 AM